अजून ७ खासदारांचा हवा पाठिंबा, सरकार बहुमतासाठी मतांची जुळवा जुळव...

Foto
नवी दिल्ली : एप्रिल २०२६ महिला आरक्षण बिलाआडून सरकार मतदारसंघ पुनर्रचना बिल लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत विरोधकांनी एकजूट दाखवली. दोन्ही बिलं बारगळली. संसदेत सरकार तोंडघशी पडले मात्र यावेळी  मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला विधेयकासाठी सरकारने  मोठी तयारी केली आहे . अर्थात अजूनही ७ खासदारांचा जुगाड केंद्र सरकारला करावा लागणार आहे. दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमकेने आता भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. बहुमताचा जुगाड करण्यासाठी मोदी सरकारने हुकमी एक्का बाहेर काढला आहे.

नोव्हेंबर २०२६ मध्ये लोकसभेत एकूण ५४० सदस्य आहेत. तीन जागा रिक्त आहेत. सर्व सदस्यांनी मतदान केल्यास या विधेयकाला मंजूरी मिळण्यासाठी ३६० मतांची गरज लागेल. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे ३२० खासदार आहे. एप्रिलमध्ये हे संख्याबळ २९३ इतके होते. तृणूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी आणि शिंदे सेनेत आलेल्या ठाकरे सेनेच्या सहा खासदार एनडीएत आल्याने रालोआचे संख्याबळ वाढले आहे. आता उर्वरीत ७ खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठीही सरकारने गणित सोडवलं आहे.

१७ एप्रिल २०२६ रोजी या दोन्ही विधेयकाच्या बाजूने २९८ मतं पडली होती. तर विरोधात २३० मतं पडली होती. त्यावेळी सरकारला ५४ मतांची गरज होती. मतांचा हा खड्डा भरून काढण्यात सरकारने काय केले हे उभ्या देशाने पाहिले आहे. आता रालोआबाहेरील द्रमुक (२२), शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (८) आणि  (४) या पक्षांचे समर्थन मिळाल्यास बहुमताचा आकडा ३५४ पर्यंत जाईल. तरीही सरकारला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ७ मतांची गरज आहे. तर १० खासदारांनी मतदानावर बहिष्कार घातल्यास आवश्यक मतांची संख्या घटून ती ३५३ पर्यंत येऊ शकते. हाच हुकमी एक्का सत्ताधारी वापरण्याची शक्यता आहे. विरोधी गोटातील दहा खासदार जरी मतदान प्रक्रियेवेळी गैरहजर राहिले तरी सरकारचे मताचे गणित जुळून येईल.

राज्यसभेतील सध्याची स्थिती
वरिष्ठ सभागृह, राज्यसभेत एकूण २४४ सदस्य आहेत, त्यात एक जागा रिक्त आहे. दोन तृतीयांश बहुमतासाठी सरकारला या सभागृहात १६३ मतांची गरज आहे. एनडीएकडे १५४ खासदार आहेत. त्यांना राज्यसभेत ९ मतांची गरज आहे. बीजू जनता दल ५ आणि  चे ४ खासदार समोबत आल्यास १६३ मतांचा आकडा गाठता येऊ शकतो. तर द्रमुकचे ८ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार सोबत आल्यास सरकारला १७२ खासदारांचे संख्याबळ सिद्ध करता येईल. शरद पवार राष्ट्रवादी आणि द्रमुकने सरकारकडे या विधेयकाविषयी ज्या अटी आणि शर्ती मांडल्या होत्या. त्यातील अनेक पूर्ण झाल्याचे समजते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष या विधेयकासाठी अनुकूल असल्याचे मानले जात आहे.